संदेश

जून, 2021 की पोस्ट दिखाई जा रही हैं

संविधान गौरवगीत

  संविधान गौरव गीत संविधानामुळे जगी एकमेव ठरला। भारता मान हा मिळाला।।धृ।। भेदभावाचा इतिहास क्रूरच होता। ज्याने देश कलंकित होता।। मूळवंशांची अशी भर्त्सना केली। त्यांची अवनति होतच गेली।। सवे आर्यांचे त्रिवर्ण श्रेष्ठ बनविले। इतरां हक्क-वंचित केले।। स्त्री अस्पृश्यांना अतिहीन ठरवूनी। टाकले माणूसपण हिरावूनी।। जे शूद्र म्हणूनी हरलेले अस्पृश्य म्हणूनी तोडलेले स्त्रीदास्यामुळे लूटलेले त्यांच्या स्वातंत्र्याचा गंध देशी पसरला।।१।। विद्या बंदनी झालेली एकापाशी। तिचे उरले ना नाते सगळ्यांशी।। वाट प्रगतीची खुली सर्वांना नव्हती। सत्ता जुलमी मुठभरां हाती।। श्रमकरी इथे जातीत विभागून राही। त्याच्या घामाला मोलच ठेवले नाही।। ज्ञान,गुण,कर्म सारे जात असे वाया। त्यावर वर्णजाती काळी छाया ।। जे ज्ञानापासून मूकलेले, जे संधी वाचून अडलेले, जे वित्तापायी नडलेले. समतेचा मार्ग महान त्यांसाठी उघडला।।२।। इथे धर्म अनेक सर्वांना आपुला प्यारा। कित्येक पंथ पसारा।। देशात अशा कैक संस्कृत्या प्रवाही। कोणी कोणाचे ऐकत नाही।। स्थितीत अशा कसा होणार कारभार। भारता ध्वज कुठला शोभणार?।।       नको धर...